भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ निवडणूकीकरीता मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ निवडणूकीकरीता मतदान २८  मे २०१८ रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या १८ मे २०१८ रोजीच्या परिपत्रकान्वये मतदानाचे दिवशी मतदार क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल, असे निवडणूक निर्यण अधिकारी यांनी कळविले आहे.  
 
 
 
मतमोजणी इमारतीत मोबाईल आणण्यास मनाई
 
 
सदर निवडणूकीची मतगणना ३१ मे २०१८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणीचे कामाकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणीच्या इमारतीत धुम्रपान करण्यास व भ्रमणध्वनी आणण्यास मनाई आहे. मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनी आणल्यास जप्त करण्यात येईल. तसेच धुम्रपान केल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@