...मोदींनी हे करून दाखवाव : राहुल गांधींचे मोदींना आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |


देशभरात झालेल्या पेट्रोल आणि डीझेलच्या भाववाढीवरून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचे 'फिटनेस चॅलेंज' स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील मोदींना एक चॅलेंज दिले असून मोदींनी देशीतील पेट्रोल आणि डीझेलचे भाव कमी करावेत, असे आव्हान गांधींनी दिले आहे. अन्यथा कॉंग्रेसच्या विरोधाला तयार राहावे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी आज एक ट्वीट केले असून यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना हे आव्हान दिले आहे. मोदींनी ज्या प्रकारे विराट कोहलीचे आव्हान स्वीकारले आहे. त्याच प्रकारे त्यांनी माझे पण आव्हान स्वीकारून देशातील पेट्रोल आणि डीझेलचे भाव कमी करून दाखवावेत, अन्यथा कॉंग्रेस देशव्यापी आंदोलन करेल व या आंदोलनाला पंतप्रधानांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील गांधींनी यामधून दिला आहे.


दरम्यान राहुल गांधींच्या या आव्हाननंतर कॉंग्रेसच्या सोशल मिडिया टीमने एक नवीन माहिती जनतेसमोर ठेवली असून गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारने पेट्रोल-डीझेलच्या माध्यामतून देशाच्या जनतेकडून १० लाख कोटी रुपये वसूल केल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक कपात झाली आहे. परंतु मोदी सरकारने पेट्रोल-डीझेलवरील अतिरिक्त करांमध्ये सातत्याने वाढ करत डिसेंबर २०१७ पर्यंत देशाच्या जनतेकडून ९.९५ लाख कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यामुळे सरकार विकासाच्या नावावर जनतेचे शोषण करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@