विराट कोहलीने नरेंद्र मोदी यांना दिले 'फिटनेस चॅलेंज'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने 'फिटनेस चॅलेंज' दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी 'हम फिट तो इंडिया फिट' नावाचे अभियान सुरु केले आहे. याला सध्या सोशल मीडियामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतील अभिनेते, खेळाडू, राजकीय व्यक्ती एकमेकांना 'फिटनेस चॅलेंज' देत आहेत.
 
 
 
 
 
सामान्य व्यक्ती देखील एकमेकांना 'फिटनेस चॅलेंज' देवून आपण किती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत याची प्रचीती आपल्या आप्तेष्टांना करून देत आहेत. विराट कोहली याने काल ट्वीटरवरून नरेंद्र मोदी यांना 'फिटनेस चॅलेंज' दिले आता नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीटरवरून हे 'फिटनेस चॅलेंज' मान्य केले आहे. तसेच अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना देखील विराटने हे 'फिटनेस चॅलेंज' दिले आहे. 
 
 
 
 
 
नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर 'योग'ला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यामुळे संपूर्ण जग 'योग'कडे अजून जास्त प्रमाणात आकर्षित झाले. आता याच अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी भारतात 'हम फिट तो इंडिया फिट' नावाचे अभियान सुरु केले आहे. त्यामुळे आता भारत लवकरच शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे नवे पाऊल टाकणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@