अमेरिका आणि उ.कोरियामध्ये पुन्हा तणाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |

सिंगापूर येथील प्रस्तावित भेट रद्द 





वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून किम जोंग उन याच्या वक्तव्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिंगापूर येथे होणारी भेट रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाउसने याविषयी एक पत्र किम जोन उनला पाठवले असून यामध्ये ही रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

आपल्या पत्रामध्ये ट्रम्प यांनी किमच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, उत्तर कोरियाबरोबर होणाऱ्या भेटीसंबंधी आपण अत्यंत आशावादी होतो, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु किम जोंग उन यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या मनातील राग आणि अमेरिकेसंबंधीची द्वेषबुद्धी स्पष्ट दिसून येत आहे, त्यामुळे अशा वातावरणात दोन्ही देशांनी भेट घेऊन चर्चा करणे योग्य होणार नसून अमेरिकेने ही चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

याचबरोबर किम जोंग उनच्या धमकीला उत्तर देताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अणुशक्ती बद्दल देखील त्यांनी भाष्य केले आहे.'तुम्ही आम्हाला तुमच्या अणुशक्तीविषयी सांगता, परंतु अमेरिकेची अणुशक्ती तुमच्या पेक्षा कित्येक पटीने मोठी असून आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो कि, या अणुशक्तीचा वापर करण्याची वेळ अमेरिकेवर कधीच येऊ नये' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेने चर्चसाठी दिलेल्या संधीवर पुन्हा एकदा विचार करून आपला निर्णय कळवावा, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.


 
 
दरम्यान ट्रम्प यांच्या या पत्रामुळे जागतिक राजकारणामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांचे वैर विसरून दोन्ही देश एकत्र येत असल्यामुळे आणि उत्तर कोरियाने अणु शस्त्रांचा वापर न करण्याचे आश्वासन दिल्यामुळे सर्व देशांना आनंद झाला होता. परंतु ट्रम्प यांच्या पत्रावर उत्तर कोरिया काय उत्तर देणार, याची चिंता सर्व देशांना लागली आहे. 
@@AUTHORINFO_V1@@