सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |

महानगर दंडाधिकाऱ्यांचा परस्पर निर्णय; २८ तारखेला होणार सुनावणी 



नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा खटला परस्पररित्या दिल्लीतील एका विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची घटना घडली आहे. थरूर एक हे संसदेचे सदस्य असल्यामुळे खासदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयामध्येच या प्रकरणावर सुनावणी करण्यात येईल, असे स्पष्टीकरण यावर देण्यात आले आहे. परंतु या कृतीमागे थरूर यांचा हात असून आपल्या बाजूने निकाल लागावा, यासाठी थरूर यांनी ही खेळी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

दिल्लीतील महानगर दंडाधिकारी धर्मेंद्र सिंह यांना हा खटला हस्तांतरित केला असून दिल्लीतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्या विशेष न्यायालयाकडे हा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. तसेच येत्या २८ तारखेला या प्रकरणी सुनावणी करण्यात येणार असल्याचे देखील दंडाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकाएकीं घेतलेल्या या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

गेल्या १४ तारखेलाच दिल्ली पोलिसांनी पटियाला न्यायालयात या घटनेसंबंधीची आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये पुष्कर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. तब्बल चार वर्ष चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे आरोपपत्र कलम ३०६ आणि ४९८अ अंतर्गत दाखल केले होते. जेणेकरून पुष्कर यांच्या मृत्यूसाठी थरूर यांना जबाबदार मानले जात होते.
@@AUTHORINFO_V1@@