चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात नवीन दुध संकलन केंद्र सुरू करावीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |
 
 

 

मदर डेअरीला केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांची सुचना
 
शासनाच्या कृषिपुरक धोरणामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात दुध उत्पादन वाढल्याने शेतक-यांना उचित मुल्यावर दुध विक्री करता यावी याकरिता मदर डेअरीने नवीन दुध संकलन केंद्र सुरू करण्याची सुचना हंसराजजी अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी मदर डेअरीचा आढावा सभेत दिली. सदर सभा दि. २३ मे रोजी रवि भवन, नागपूर येथे पार पडली. यावेळेस गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, ठाकरे, भाप्रसे, अतिरिक्त आयुक्त नागपूर विभाग, नागपूर  अतुल नाकरा, राज्य प्रमुख मदर डेअरी निखील देशमुख, विदर्भ प्रमुख मदर डेअरी, पांडे चंद्रपूर प्रमुख मदर डेअरी,  ढोके, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते. 
 
 
 
यावेळेस दोन्ही जिल्हयातील उत्पादन, संकलन व विक्री याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील कढोली-रामपूर, राजुरा-नलखडी-विहीरगांव, कोरपना-लखमापूर या मार्गावर दुध संकलन केंद्र तसेच यवतमाळमध्ये घाटंजी-पारवा-घोटी, वणी तालुक्यातील चिखलवर्धा-नांदेपेरा-कायर, रासा-सिरपुर, नायगांव (सावंगी), पांढरकवडा तालुक्यात पांढरकवडा व बोरी येथे नव्याने दुध संकलन केंद्र स्थापन करण्याची सुचना मंत्राी महोदयांनी दिली. 
 
 
 
मदर डेअरीद्वारे चंद्रपूर एमआयडीसीमध्ये ५० हजार लिटरचे दुध शितकरण केंद्र स्थापित होणार असून एक ते दोन महिन्यात ते कार्यान्वित होईल अशी माहिती मदर डेअरीचे नाकरा यांनी दिली. याच वेळेस चंद्रपूर जिल्हयातील बीएमसी, एमपीए यांचे चुकारे वेळेवर मिळत नाहीत तसेच शेतक-यांचे देयके विवरण वेळेवर मिळत नाहीत अशी तक्रार समोर आली. त्यावार या सर्व त्राुट्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश ना. अहीर यांनी दिले. दुधाचे उत्पादन अधिक व्हावे याकरिता पशुसंवर्धन विभागातर्फे वैद्यकीय सेवा व सुविधा, पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त श्री ठाकरे यांनी बैठकीत मंत्राी महोदयांना सांगितले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@