भारताच्या विकासात मोदी सरकारची भूमिका महत्त्वाची : नेदरलँड पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |

दोन्ही देशांमध्ये एकूण नऊ करारांवर स्वाक्षऱ्या

इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये नेदरलँड देखील सहभागी 


नवी दिल्ली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार अत्यंत उत्तम कामगिरी करत असून भारताच्या विकासामध्ये मोदी सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,'अशी प्रतिक्रिया नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांनी आज दिली. नवी दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते. तसेच आजपासून नेदरलँड हा देखील इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सहभागी होत असून यापुढे नेदरलँड देखील या परिषदेचा सदस्य असेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
आपल्या भाषणामध्ये रूट यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचा गौरव करत, भारताच्या आणि जगाच्या विकासामध्ये पंतप्रधान मोदी हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. गेल्या अनेक वर्षांमध्ये नेदरलँडने भारताकडून अनेक गोष्टी आत्मसात केल्या असून भारताकडून आम्ही खूप काही शिकत असल्याचे त्यांनी म्हटले. आज नेदरलँड आणि भारत हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकमेकांसह कार्य करत असून दोन्ही देशांमध्ये राजकीय ते आर्थिक असे अनेक संबंध आज प्रस्थापित झाले आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरूनच नेदरलँड या अलायन्समध्ये सहभागी झाला असून यामुळे नक्कीच सर्व जगाला फायदा होईल, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

भारत आणि नेदरलँड यांच्यात झालेले करार :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सहभागी झाल्याबद्दल नेदरलॅंडचे अभिनंदन केले, तसेच आयएसओमध्ये भारत आणि नेदरलँड या देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून आयएसओमध्ये सहभागी झाल्यामुळे भारत आणि नेदरलँड यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचले आहेत' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. तसेच आपल्या भाषणामध्ये गेल्या ७० वर्षांमधील भारत आणि नेदरलँड यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर भाष्य केले. 'गेल्या अनेक वर्षांमध्ये नेदरलँड हा भारताचा एक उत्तम मित्र म्हणून भारतासह नेहमी उभा आहे,' असे मोदींनी यावेळी म्हटले. तसेच मागील वर्षी आपल्या नेदरलँड दौऱ्यानंतर हे संबंध आणखीनच दृढ झाले असल्याचे त्यांनी म्हटले.




@@AUTHORINFO_V1@@