नरेंद्र मोदी यांनी मार्क रुट्टे यांची घेतली भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज नवी दिल्ली येथील हैदराबाद हाउस येथे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत कृषि आणि अन्न प्रक्रिया, फलोत्पादन, जल व्यवस्थापन, वाहतुकीची सुविधा, जीवन विज्ञान आणि आरोग्य या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. 
 
 
 
 
 
 
 
 
नेदरलँड्स तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे भारताला नेदरलँड्स या दोन क्षेत्रांमध्ये मदत करू शकतो. भारत सध्या संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जात आहे. त्यामुळे सध्या भारताला या क्षेत्रामध्ये सहकार्याची गरज असल्याने नेदरलँड्स हा देश भारताला चांगली मदत करू शकतो असे नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे. म्हणून भारत आणि नेदरलँड्स हे दोन्ही देश एकमेकांचे संबंध घट्ट करण्याचे प्रयत्न सध्या करीत आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@