प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते समग्र शिक्षा योजेनेचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 'समग्र शिक्षा योजेने'चे उद्घाटन करण्यात आले आहे. विद्यार्थांची शैक्षणिक पात्रता कशी वाढवता येईल याकडे या योजनेत जास्त लक्ष देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची समग्रता, एकाग्रता, कौशल्य सुधार, मुलांमध्ये शैक्षणिक आसक्ती कशी वाढवता येईल याचा या योजनेच्या माध्यमातून अभ्यास करता येणार आहे. 
 
 
 
 
 
मुलांना आणि शिक्षणाला सशक्त बनविण्यासाठी या योजनेचे निर्माण करण्यात आले आहे. मुलांमध्ये शैक्षणिक जागृती आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी सरकारकडून काही नवे प्रकल्प या योजनेंतर्गत आयोजित केले जातील. याचा उपयोग मुलांमध्ये बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केला जाईल. 
 
 
 
 
 
आज नवी दिल्ली येथे या योजनेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. मेक इन इंडिया, सर्व शिक्षा अभियान या योजनांना लागून ही योजना तयार करण्यात आली आहे. भारताचे भविष्य चांगले निर्माण करायचे असेल तर आजच्या नव्या पिढीचा शैक्षणिक पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही योजना तयार करण्यात आली आहे अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@