राष्ट्रपतींनी त्यांच्या नातवंडांना दिली एक खास 'भेट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |


 
 
शिमला :   राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नातवंडांना एक 'खास' भेट दिली आहे. उन्हाळ्यात विरंगुळा म्हणून त्यांनी चांगले काहीतरी करावे या दृष्टीने राष्ट्रपती कोविंद आपल्या नातवंडांना शिमला येथील पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेले. तिथून त्यांनी आपल्या नातवंडांना पुस्तके घेऊन दिली आहेत. त्यामुळे त्यांचा उन्हाळा आता वाचनात जाणार आहे.
 
 
 
 
 
वाचन संस्कृती आपल्या पुढील पिढी पर्यंत पोहोचावी आणि आजच्या डिजीटल युगात किंडल आणि इतर पर्याय असताना देखील आपल्या पुढील पिढीने पुस्तके वाचावी यासाठी कोविंद यांचे हे स्तुत्य पाउल आहे. यामुळे नवीन पिढीला वाचनाची प्रेरणा मिळते.
 
 
यावेळी त्यांनी भारतात नव्याने रुजत असलेल्या "डिजीटल पेमेंट" किंवा "कॅशलेस पेमेंट" पद्धतीचे देखील कौतुक केले. "भारतात वाढत चाललेल्या डिजीटल पेमेंट संस्कृतीचा अनुभव घेऊन आनंद झाला." असे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@