सार्क चित्रपट महोत्सव आजपासून कोलंबो येथे सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
कोलंबो : ८ व्या सार्क चित्रपटाला आजपासून कोलंबो येथे सुरुवात होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात २६ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. तसेच या चित्रपट महोत्सवात एक पुरस्कार समारंभ देखील आयोजित करण्यात येणार आहे. या पुरस्कार समारंभासोबत हा चित्रपट महोत्सव संपणार आहे. 
 
 
 
 
 
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात सार्क देशाचे सदस्य देश भाग घेणार असून सांस्कृतिकदृष्टीने या सगळ्या देशांचे संबंध घट्ट व्हावे या दृष्टीने हा महोत्सव आयोजित केला जात असतो. दरवर्षी हा महोत्सव २०११ पासून आयोजित केला जात आहे. 
 
 
 
बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट शॉर्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर, सर्वोत्कृष्ट संपादक असे पुरस्कार या महोत्सवामध्ये देण्यात येणार आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका हे देश या महोत्सवात भाग घेणार असून या देशांचे उत्कृष्ट चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@