सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनींची प्रतिष्ठेच्या ‘आयएएस शिष्यवृत्ती’साठी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागामधील (आयबीबी) दोन विद्यार्थिनींना या वर्षीची प्रतिष्ठेची ’आयएएस शिष्यवृत्ती’ मिळाली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देशातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीमध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांबरोबर दोन महिन्यांच्या काळासाठी थेट काम करण्याची संधी देण्यात येते.
 
या वर्षी आयबीबीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या नताशा केळकर आणि मैत्रेयी पूर्णपात्रे या विद्यार्थिनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत नताशा हैदराबादमधील एल.व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिक डॉ. इंद्रजीत कौर यांच्याबरोबर काम करणार आहे. नताशा मायओपिया आणि ग्ल्युकोमासंदर्भात कौर यांच्यासमवेत काम करणार आहे. "या संधीमुळे उत्साह वाढला असून मी लवकरात लवकर लॅबमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे,” अशी भावना नताशाने व्यक्त केली.
 
मैत्रेयी बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील प्रख्यात वैज्ञानिक डॉ. संदीप ईश्वरप्पा यांच्याबरोबर काम करणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी देशभरातील प्राप्त झालेल्या अर्जांनंतर अकादमीकडून निवडक प्रतिभावान उमेदवारांची निवड केली जाते. या पार्श्वभूमीवर नताशा व मैत्रेयीची झालेली निवड ही विद्यापीठासाठी व विशेषत: आयबीबीसाठी अभिमानाची बाब आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@