...तर पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त होऊ शकतं : चिदंबरम्

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |

 
 
पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीमुळे देशात सध्या नाराजी वातावरण असतानाच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी पेट्रोल दरासंबंधी एक नवे वक्तव्य केले आहे. 'सरकारनं ठरवलं तर पेट्रोलच्या दरामध्ये २५ रुपयांपर्यंत कपात केली जाऊ शकते, परंतु सरकार असं करणार नाही' असे तिरकस वक्तव्य चिदंबरम् यांनी आपल्या सोशल मिडीयावर केले आहे.

चिदंबरम् यांनी थोड्यावेळापूर्वीच ट्वीट करून असे म्हटले आहे कि, आंतराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाल्यामुळे सरकारची प्रती लिटर १५ रुपयांची बचत होत आहे. त्यातच सरकार पेट्रोल आणि डीझेलवर १० रुपयांचा अतिरिक्त कर लावून पेट्रोल आणि डीझेलची विक्री करत आहे. त्यामुळे जर सरकारने ठरवले तर पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये २५ रुपयांपर्यंत कपात केली जाऊ शकते' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये त्यांनी यामधून देखील सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्या अनुमानानंतर सरकारवर तिरकस टीका करताना त्यांनी म्हटले आहे कि,' २५ रुपयांपर्यंत कपात केली जाऊ शकत असताना देखील सरकार मात्र ही कपात करणार नाही. उलट १ किंवा २ दोन रुपयांची कपात करून जनतेला तात्पुरत्यास्वरूपात भुलविण्याचा मात्र प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.







दरम्यान चिदंबरम् यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला असून आपल्या या वक्तव्यामुळे चिदंबरम् यांनी स्वतःच जनतेचा रोष आपल्यावर ओढवून घेतला आहे. चिदंबरम् यांनी 'ज्या' अपेक्षेने हे वक्तव्य केला आहे, नेमकी त्याच्या उलट प्रतिक्रिया सध्या त्याच्या या वक्तव्यावर येऊ लागली आहे. चिदंबरम यांना हा शहाणपणा विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतरच कसा काय सुचला ? असा प्रश्न काही जण विचारात आहेत. तर काहींच्या मते चिदंबरम् हे जाणूनबुजून जनतेच्या मनात रोष निर्माण प्रयत्न करत आहे. परंतु चिदंबरम् यांनी तेलांच्या किमतींवर बोलण्याअगोदर आपल्या आणि आपल्या मुलाच्या संपत्तीचा अगोदर होशोब द्यावा, अशी टीका सामन्य नागरिकांकडून केली जात आहे.




@@AUTHORINFO_V1@@