नाशिकरोड-कल्याण लोकल सुरू होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |

ऑक्टोबरमध्ये नाशिककरांच्या सेवेत लोकल होणार दाखल

 

 
 
 
नाशिक : नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला जोडणारी लोकल रेल्वेसेवा सुरू होणार असून, ताशी ५० किमी वेग असणारी ही लोकल येत्या ऑक्टोबरपर्यंत नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. दिल्लीच्या मेट्रोसारख्या सुखसोयी या ट्रेनमध्ये असणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला या लोकलमुळे चालना मिळणार आहे. खा. हेमंत गोडसे यांच्या मागणीप्रमाणे आणि रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांच्या संकल्पनेने ही सेवा नाशिककरांना मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
 
  
नाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्टेशनवर उतरून लहान स्टेशनवर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन खा. हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जनतेसाठी रेल्वे विभागाकडे कसारा ते नशिक लोकलची मागणी केली होती. मात्र, कसारा ते नाशिक लोकल सुरू केल्यास ही लोकल तोट्यात जाईल, असा निकष रेल्वेने काढला होता. म्हणून रेल्वे बोर्डाने या गोष्टीचा अभ्यास करून रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचनांमध्ये रेल्वे इंजिनतज्ज्ञ आणि इगतपुरी स्थानकातील निवृत्त मुख्य इंजिन निरीक्षक वामन सांगळे यांनी खा. हेमंत गोडसे यांच्या मार्फत 2016 मध्ये कल्याण ते नाशिक रेल्वे सुरू करावी, अशी सूचना मांडली होती. ही सूचना ध्यानात घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेला हिरवा कंदील दाखवला होता. नाशिककरांच्या सेवेत ही लोकल ऑक्टोबरमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत रेल्वेच्या सूत्रांनी दिले आहेत.
 
कालांतराने होणारा बदल
 
डीएमयू (डीझेल मल्टिपर्पज युनिट) वर चालणारी ही लोकल कालांतराने ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) वर सुरू करणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@