एच.डी. कुमारस्वामी आज घेणार कर्नाटक मुख्यमंत्री पदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
कर्नाटक : कर्नाटक राज्यातील नाटकीय घडामोडीनंतर शेवटी आज जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आज कर्नाटक मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बेंगळूरु येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर इकडे भारतीय जनता पक्षाने आजचा दिवस हा 'जन विरोधी दिवस' म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. 
 
 
 
दीड दिवस मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणारे माजी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर आता एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. जेडीएस आणि काँग्रेस यांच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री काँग्रेसचे नेते जी. परमेश्वरा यांची वर्णी लागलेली आहे. 
 
 
 
परमेश्वरा यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५१ मध्ये म्हैसूर येथे झाला होता. ते सध्या कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असून १९८९ पासून ते राजकारणामध्ये सक्रीय आहेत. कर्नाटक सरकारमधील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले असून सिद्धरामय्या सरकारमध्ये राज्याच्या गृह मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
 
 
 
त्यामुळे आज थाटात एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@