पर्यावरण, आरोग्य, सुरक्षा- जूनमध्ये प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : औद्योगिक हिताचे विविध पैलू जोपासले जावेत तसेच समाज व पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी जोपासली जावी यासाठी विविध समित्या ’निमा’द्वारा कार्यरत आहेत. यातील एक समिती म्हणजे ‘इएचएस कमिटी.’ पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा यासंबंधात कार्य करणारी ही समिती आपला कार्यभार यशस्वीपणे पार पाडत असून, यासंबंधांत इएचएस कमिटीतर्फे ‘इएचएस प्रदर्शना’चे आयोजन दि. ६ ते ८ जूनदरम्यान नाशिकमधील अंबड येथील नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरच्या वातानुकूलित सभागृहात होत असल्याचे निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
 
नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)च्या पुढाकाराने जागतिकीकरणाच्या या युगात स्पर्धात्मक बाजारपेठेत यशस्वी वाटचाल करण्यासाठी उद्योगांना विशेषत: लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व पर्यावरणाच्या निकषांची ओळख व्हावी या उद्देशाने ‘इएचएस एक्झिबिशन’चे आयोजन निमातर्फे करण्यात आले आहे. अशा पद्धतीचे हे पहिलेच प्रदर्शन ठरेल.
 
निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, इएचएस समितीचे अध्यक्ष सुधीर आवळगांवकर यांचा अनुभव व काटेकोर नियोजन, निमा कार्यकारिणीचे सामूहिक प्रयत्न यातून साकारणार्‍या या प्रदर्शनात एकूण ३८ स्टॉल असून सर्व स्टॉल्स् बुक झाले आहेत. प्रदर्शनात सुरक्षा साहित्याचे उत्पादन करणारे उद्योजक, रुग्णालये, पर्यावरणीय प्रयोगशाळा, महाविद्यालये, सोलार पॉवर डेव्हलपर्स, एसटीपी अ‍ॅण्ड इटीपी मॅन्युफॅक्चरर्स, फायर हायड्रंट एजन्सीज्, वर्क अ‍ॅट हाईट अ‍ॅण्ड डेप्थ इक्विपमेंट्स अशी नावीन्यपूर्ण उत्पादने तसेच पीपीईज् एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्ट्स, एसटीपी, ईटीपी मॅन्युफॅक्चरर्स, कन्सल्टंट्स, एनर्जी एफिशियंट प्रॉडक्ट्स, सोलार डेव्हलपर्स, फायर हायड्रन्ट एजन्सीज्, नवीन तंत्रज्ञान, ग्लोबल सॉफ्टवेअर सोल्युशन्स् प्रोव्हायडर्स, अल्टरनेटिव्ह सप्लायर्स, कन्सल्टंट्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांचा स्टॉलधारक म्हणून सहभाग आहे. तरी वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, अभियंते, प्लंबर्स, मेन्टेनन्स् व्यावसायिक, फायर फायटर्स, मनुष्यबळ व्यावसायिक, प्रथमोपचार व्यावसायिक, मटेरियल्स्, सोर्सिंग टीम्स्, डॉक्टर्स आदींसाठीही हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.
 
प्रदर्शनाद्वारे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य क्षेत्रातील उद्योगांना व्यवसायवाढीच्या विविध संधी उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांनी भेट द्यावी, असे आवाहन निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, उपाध्यक्ष उदय खरोटे, मनिष कोठारी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@