विधानपरिषद निवडणुकीचा कौल मतपेटीत विसावला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

२४ मे रोजी निकाल जाहीर होणार

 
 
मुंबई : विविध ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडले. आता येत्या २४ मे रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
 
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा यामध्ये समावेश आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत दुपारी चार वाजेपर्यंत ९९.५७ टक्के मतदानाची नोंद झाली. ९४० पैकी ९३८ जणांनी मतदान केले तर कर्जत आणि पनवेलमधील प्रत्येकी एका मतदाराची मतदानासाठी अनुपस्थिती होती. अनुपस्थित दोन्ही शेकापचे लोकप्रतिनिधी आहेत. नाशिकमध्ये सर्वच्या सर्व ६४४ जणांनी मतदानाचा हक्क बजवल्यामुळे १०० टक्के मतदान झाले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात ९९.९ टक्के मतदान झाले. एक हजार पाच मतदारांपैकी १ हजार ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद (२९१) आणि लातूर (३५३) मध्ये शंभर टक्के मतदान झाले असून बीडमध्ये (३६०) एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही. परभणी-हिंगोलीतील ५०१ पैकी ४९९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराची आकडेवारी ९९.६० टक्के राहिली. अमरावतीत ४८९ पैकी ४८८ सदस्यांनी मतदान केले. ही टक्केवारी ९९.८० टक्के इतकी होती. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधील जागेसाठी ९९.७२ टक्के मतदान झाले. १०५९ मतदारांपैकी १०५६ जणांनी मताधिकार बजावला.
 
विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार :
 
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)
परभणी-हिंगोली : विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)
उस्मानाबाद-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप) विरुद्ध अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध अनिल मधोगरिया (काँग्रेस)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : इंद्रकुमार सराफ (काँग्रेस) विरुद्ध रामदास आंबटकर (भाजप)
 
या आमदारांचा कार्यकाळ समाप्त : 
राष्ट्रवादी काँग्रेस : अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
राष्ट्रवादी काँग्रेस : जयंत जाधव (नाशिक)
राष्ट्रवादी काँग्रेस : बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
काँग्रेस : दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)
भाजप : प्रवीण पोटे (अमरावती)
भाजप : मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)
 
@@AUTHORINFO_V1@@