विमानसेवा आता अधिक 'ग्राहकाभिमुख'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

विमान मंत्रालयाकडून नवा 'पॅसेंजर चार्टर ड्राफ्ट' सादर




नवी दिल्ली : देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमानसेवा अधिक 'ग्राहकाभिमुख' बनविण्यासाठी केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचले असून विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेला नवा 'पॅसेंजर चार्टर ड्राफ्ट' सरकारने आज जाहीर केले आहे. यामध्ये प्रवाशांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रवाशांच्या तिकीट रद्द करण्यावरील सर्व दंड रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज दिली आहे. दरम्यान केंद्रीय विमान उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील या नव्या धोरणांवर आनंद व्यक्त केला असून ग्राहकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देणे हेच सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित एका परिषदेमध्ये त्यांनी याविषयी माहिती दिली असून नव्या ड्राफ्टमध्ये ग्राहकांना आपल्या प्रवासवेळेच्या २४ तास अगोदर आपले तिकीट निशुल्कपणे रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवासवेळेच्या २४ अगोदर प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केल्यास अथवा त्यामध्ये कसलाही बद्दल केल्यास त्यांना कसल्याही प्रकारच दंड आकारला जाणार नाही, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी जर एखाद्या प्रायव्हेट एजेंटकडून तिकीट बुक केल्यास अथवा रद्द केल्यास मात्र त्यांना कसल्याही प्रकारची सवलत अथवा परतावा मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.



याचबरोबर प्रवाशांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विमान कंपन्यांच्या चुकीमुळे एखादे विमान रद्द झाल्यास, प्रवाशांना चार तासांहून अधिक उशीर झाल्यास अथवा एखादी कनेक्टींग फ्लाईट सुटल्यास त्याचा परतावा प्रवाशांना दिला जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच ग्राहकांच्या सामना देखील पूर्ण सुरक्षा देण्याच्या दृष्टीने सरकारने काही निर्णय घेतले असून ग्राहकांचे समान हरवल्यास अथवा खराब झाल्यास त्यावर अनुक्रम ३ हजार रुपये प्रतिकिलो व १ हजार रुपये प्रतिकिलो अशी नुकसान भरपाई सरकार देणार आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे.

याचबरोबर विमान प्रवासाच्या अधिकाधिक सेवा या ऑनलाईन करण्यात येणार असून प्रत्येक विमानतळावर कमीतकमी अर्धा तास मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर ट्रायच्या परवानगीनंतर विमानप्रवासा दरम्यान देखील प्रवाशांना वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याविषयी प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे सिन्हा यांनी सांगितले. 

@@AUTHORINFO_V1@@