शिवसेनेच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे रिंगणात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

पालघर जिल्ह्यात सभांचे आयोजन

 
 
 
 
मुंबई : सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसीठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्राचारार्थ उद्धव ठाकरे नालासोपारा आणि बोईसरमध्ये हजेरी लावणार आहेत.
 
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कासा आणि नालासोपारा या ठिकाणी प्रचार सभा घेत विरोधकांना धारेवर धरले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील रिंगणात प्रचारासाठी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २३ मे रोजी नालासोपा-यात तर दि. २५ मे रोजी बोईसरमध्ये ते सभा घेणार आहेत. दरम्यान, २३ मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील विरार परिसरत सभा घेणार असल्याने दोघेही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, २३ मे रोजी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठई पोलिसांच्या अधिक तुकड्यादेखील तैनात करण्यात येणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@