राज्यवर्धन सिंह राठौड यांनी कार्यालयात स्वीकारले 'फिटनेस चॅलेंज'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  भारताच्या क्रीडामंत्री पदी एक अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड करण्यात आली आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. क्रीडा मंत्र्याने एक योग्य खेळाडू असणे अत्यंत आवश्यक असते आणि आणि त्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता असते 'फिटनेस' ची. "हम फिट तो इंडिया फिट" हे चॅलेंज स्वीकारत राज्यवर्धन सिंह राठौड यांनी आपल्या कार्यालयातच "पुशअप्स" म्हणजेच जोर मारले आहेत. आणि आपण कुठेही फिट राहू शकतो आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो असा संदेश त्यांनी यामधून दिला आहे.
 
 
 
 
 
त्यांच्या या व्हिडियोला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यांना काही तासातच ५.५ हजार लाईक्स आणि १.९ हजार रीट्विट्स आहेत. तसेच यामुळे त्यांनी अनेकांना कामाच्या ठिकाणी व्यायाम करण्याची किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची प्रेरणा दिली आहे.
 
 
 
 
 
त्यांनाच अनुसरून भाजप नेते आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता मनोज तिवारी यांनी देखील आपला असाच एक व्हिडियो ट्विटरवरून लोकांपर्यंत पोहोचविला आहे. या चॅलेंजची गम्मत अशी की स्वत: असा एक फोटो किंवा व्हिडियो पोस्ट करून यामध्ये आणखी लोकांना सहभागी करायचे आहे. राज्यवर्धन सिंह राठौर यांनी यामध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेता हृतिक रौशन आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांना तर मनोज तिवारी यांनी यामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान यांना जोडले आहे. आता त्यांचे देखील असेच व्हिडियोज येतात का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@