गुगलच्या की-बोर्डमध्ये आता अहिराणी भाषेचा देखील समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
आपल्या युजर्सना अजून सोप्या पद्धतीने इंटरनेट हाताळता कसे येईल याच्या प्रयत्नात नेहमीच गुगल असतो त्यामुळे भाषेच्या बाबतीत गुगल मागे कसे काय राहील. आता गुगलने चक्क अहिराणी भाषेतील गुगल की-बोर्ड तयार केला असून आता केवळ अहिराणी भाषा येणाऱ्या नागरिकांना गुगल या सर्च इंजिनचा वापर आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी करता येणार आहे. 
 
 
 
 
 
आत्तापर्यंत गुगलने अनेक प्रादेशिक भाषांमध्ये गुगल की-बोर्ड तयार केला आहे. यात मराठी, गुजराती, पंजाबी, तेलगु, कन्नड, हिंदी अशा भाषांचा उल्लेख करता येईल मात्र गुगलने पहिल्यांदाच एका बोली भाषेचा की-बोर्ड तयार केला असून आता केवळ अहिराणी भाषा येणाऱ्या नागरिकांना देखील गुगलचा वापर करता येणार आहे. 
 
 
 
गुगलने अहिराणीसोबत अजून १५ भाषांचा समावेश गुगल की-बोर्डमध्ये करून घेतला आहे. यात फिजीयन, कोमी, हाल्बी, वागडी अशा जगभरातील बोलल्या जाणाऱ्या बोली भाषांचा समावेश आहे. त्यामुळे आता गुगलच्या युजर्समध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@