नालेसफाईबाबत मुंबईकरांची दिशाभूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप


 
 
मुंबई : नालेसफाईच्या नावाखाली मुंबई महालिकेचा मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. जनतेच्या कररूपाने जमलेल्या पैशाची नालेसफाईच्या माध्यमातून उधळपट्टी सुरु असून नालेसफाईबाबत मुंबईकरांची दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. मुंबईत सध्या पालिकेची पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नालेसफाई कामचा आज पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.   
 
या पाहणी दौऱ्यात पालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, दक्षिण मध्य जिल्हा अध्यक्ष रमेश परब, नगरसेवक वकील शेख, नगरसेविका रेश्मा बानो, मोहम्मद हाशिम खान यांनी पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह आज मानखुर्द आणि धारावी विभागातील नालेसफाई कामाची पाहणी केली. मानखुर्द येथील पीएमजीपी वसाहतीजवळील नाला तर पूर्णपणे भरलेला दिसून आला. तर धारावी येथील ६० फुटी मार्गावरील आर. पी. नगर येथील नालेसफाईची कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली नव्हती. यावेळी सचिन अहिर यांनी पालिकेकडून सुरु असलेल्या नालेसफाई बाबत असमाधान व्यक्त करून केवळ कंत्राटदारांचे पोट भरण्यासाठी हा फार्स केला जात असल्याचा आरोप केला तर गटनेत्या राखी जाधव यांनीही या विरोधात आपण पालिकेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
 
त्या कामगारांना बाहेर काढले
 
नालेसफाई पहाणी दरम्यान नाल्यात दोन - तीन माणसे उतरून प्लास्टिक डब्यातून कचरा बाहेर काढत असल्याचे दिसून आले. या कामगारांना गमबूट, हॅन्डग्लोव्ज इत्यादी सोयीही उपलबध करून देण्यात आल्या नव्हत्या, यावेळी सचिन अहिर यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या सदर बाब लक्षात आणून देत त्या कामगारांना नाल्यातून बाहेर काढण्यास सांगितले
 
@@AUTHORINFO_V1@@