किलाएवा ज्‍वालामुखीचा लावा आता प्रशांत महासागरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |


हवाई : हवाई बेटावरील सर्वात मोठा ज्वालामुखी असलेल्या किलाएवा ज्‍वालामुखीच्या स्फोटानंतर आता त्याचा लावा प्रशांत महासागरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. ज्वालामुखीमधून निघणारा हा लावा गेल्या दोन दिवसांपासून महासागराच्या पाण्यामध्ये पडत असून यामुळे बेटाजवळील सागरीजीवन धोक्यात आले आहे. दरम्यान स्फोटामुळे निर्माण झालेल्या विषारी वायुमुळे बेटारील वातावरण देखील अत्यंत प्रदूषित झाले असून यामुळे नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून स्थानिक प्रशासन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.


गेल्या दोन आठवड्यांपासून ज्वालामुखीमधील हा लावा सातत्याने बाहेर येत आहे. यामुळे बेटावर असलेल्या जंगलाच फार मोठा भाग नष्ट झाला आहे. त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या धुरामुळे वातावरण आणखीनच प्रदूषित होत आहे. याचबरोबर वन्यजीवांची देखील हानी होत आहे. पर्यावरणाबरोबर बेटावरील स्थानिक नागरिकांची देखील घरे या लाव्यामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. सुरक्षा दृष्टीने बेटावरील काही महत्त्वाचे रस्ते देखील बंद करण्यात आले असून एकूण हवाईमधील पर्यटनावर या ज्वालामुखीय स्फोटाचा अत्यंत वाईट परिणाम पडला आहे.




गेल्या पाच तारखेला हवाईच्या परिसरामध्ये भूकंपाचा तीव्र झटका बसला होता. या भूकंपाच्या झटक्यामुळे हा ज्वालामुखी सक्रीय झाला होता व त्यानंतर काही वेळानंतरचा यामधून लावा बाहेर येण्यास सुरुवात झाली होती. यानंतर काही दिवसांनी या ज्वालामुखीचा भीषण स्फोट होऊन यातील राख आणि दूर ३० हजार फुटांहून अधिक उंच उडाला होता. तेव्हापासून गेली दोन आठवडे यामधून लावा सातत्याने बाहेर पडत आहे.
@@AUTHORINFO_V1@@