हवाई येथील ज्वालामुखीच्या आसपासच्या भागात वाईट परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
हवाई : अमेरिकेतील हवाई बेटावरील जगातील सगळ्यात मोठा आणि सक्रीय ज्वालामुखी फुटला असल्याने या ज्वालामुखीतून जे हानिकारक गॅस निघत आहेत त्याचा आसपासच्या भागात वाईट परिणाम होत आहे. या ज्वालामुखीतून हानिकारक वायू आणि गॅस निघत असल्याने आसपासच्या नागरिकांनी हा भाग सोडला असून नागरिक दुसरीकडे स्थलांतर करत आहेत. 
 
 
 
किलुआ येथे हा ज्वालामुखी सक्रीय झाला असून किलाएवा असे या ज्वालामुखीचे नाव आहे. या ज्वालामुखीमुळे आसपासच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी हा ज्वालामुखी फुटला असून आता या ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात लावा बाहेर पडत आहे. यामुळे तेथे राहणारे नागरिक आपले घर सोडून दुसरीकडे स्थलांतर करत असून आत्तापर्यंत बऱ्याच नागरिकांचे घर या ज्वालामुखीने गिळंकृत केली आहेत. 
 
 
 
हा ज्वालामुखी काही दिवसांपूर्वी फुटला आणि त्यामुळे ज्वालामुखी फुटल्यावर त्याचा लावारास ३० हजार फुटापेक्षा देखील उंच उडाला असून यामुळे वातावरणात उष्णता पसरली आहे. आता हा ज्वालामुखी कधी शांत होईल याकडे शात्राज्ञांचे लक्ष लागले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@