चीनच्या शिष्टमंडळाची विधानमंडळास भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : चीनच्या सिचुआन प्रांताचे उप राज्यपाल पेंग युसिंग यांनी शिष्टमंडळासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, आमदार संजय दत्त, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी उपस्थित होते. शिष्टमंडळामध्ये सिचुआन प्रांताचे उप महासचिव जू जियाद, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे उप महासंचालक लीओ डोंग, सिचुआन प्रांताच्या असेट सुपरव्हिजन ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन कमीशनचे उप महासंचालक क्वीं मिंग, फॉरेन आणि ओव्हरसीज चायनीज अफेअर्सचे उप महासंचालक चेन झिकाँग यांच्यासह सिचुआन प्रांतातील विविध विभागांचे आणि शासन अधीनस्त कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. 
महाराष्ट्रामधील तसेच मुंबईमधील औद्योगिकदृष्ट्या वातावरणाची पाहणी करण्यासाठी तसेच गुंतवणुकीच्या संधीविषयी माहिती घेण्यासाठी दौऱ्यावर आल्याचे युसिंग यांनी स्पष्ट केले. तसेच चीन-भारत मैत्रीचे संबंध या माध्यमातून अधिक बळकट व्हावेत, असा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 
विधानमंडळाच्यावतीने चीनचा दौरा केला होता त्यावेळी चीनने अल्पावधीतच केलेली प्रगती पाहून आपण प्रभावीत झाल्याचे रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले. तसेच येथे गुंतवणुकीला पूरक वातावरण असून गुंतवणूक करावी, असे ते म्हणाले. बागडे म्हणाले, राज्यामध्ये साखर, दूध आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तसेच चीन दौऱ्यादरम्यान चीनमध्ये साखर व दुधाचे उत्पादन कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या उत्पादनांची महाराष्ट्राकडून आयात करावी, असे आवाहन श्री. बागडे यांनी केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@