नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पहिल्यांदाच सीआरपीएफच्या महिला सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
बस्तर : छत्तीसगडमधील बस्तर येथे नक्षलवादी यांचा रहिवास असल्याने त्यांना शोधण्यासाठी तसेच पकडण्यासाठी आता पहिल्यांदाच सीआरपीएफच्या महिला सज्ज करण्यात येणार आहे. सीआरपीएफ पहिल्यांदाच आपली महिला कमांडर तुकडी बस्तरमध्ये सज्ज करणार आहे. ही भारतातील पहिली महिला कमांडर तुकडी असेल जी नक्षलवाद्यांसाठी सज्ज करण्यात येणार आहेत. 
 
 
 
यामुळे महिलांना रोजगार आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत मिळेल. तसेच बस्तरमधील महिला नक्षलवाद्यांना पकडणे आणि त्यांच्याकडून माहिती काढून घेणे सोपे होईल. 'बस्तरिया बटालियन' असे या तुकडीचे नाव असणार आहे. या महिला तुकडीला कोब्रा आणि सामान्य पुरुष तुकडीसोबत तैनात केले जाणार आहे. 
 
 
 
दंतेवाडा, सुकमा, नारायणपूर, बिजापूर या गावांमध्ये या तुकड्यांना सज्ज केले जाणार आहे. या बटालियनमध्ये सरकारच्या कायद्यानुसार महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आता महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असल्याने या क्षेत्रात देखील महिलांना पुढे नेणे ही सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही महिलांची तुकडी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी तयार करीत आहोत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@