अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ९९ लाख नव्या लाभार्थ्यांना फायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती

 

 
 
मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ९९ लाख नव्या शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य घेता येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. मंत्रालयातील वार्ताहर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६ लाख ६३ हजार २८२ आणि ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३६ लाख ७३ हजार ३२ याप्रमाणे एकूण ९३ लाख ३६ हजार ३१४ आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ व २ सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा ९९ लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे बापट म्हणाले. नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आता पूर्वी असलेली मुदत वाढवून आता दि. ३० एप्रिल २०१८ पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
तसेच ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, दि. ३० एप्रिल २०१८ पर्यंत आधार सिडींग होऊन पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक राहणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@