'निपाह' वायरसपासून सावधान !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

केरळमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू 




कोझिकोडे :
वाटवाघुळापासून निर्माण झालेल्या 'निपाह' (NiV) नावाच्या एका नव्या विषाणूने केरळमध्ये सध्या धुमाकुळ घातला आहे. या वायरसमुळे केरळमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना या वायरसची लागण झाली असल्याची समोर आले आहे. वैद्यकीत विभागाने याविषयी खात्री केली असून राज्य सरकारला याविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायन विजयन यांनी देखील याघटनेवर चिंता व्यक्त करत, यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.




दरम्यान केरळमध्ये सध्या तरी कोझिकोडेमध्येच या वायरसची प्रभाव जास्त प्रमाणात आढळून आल्याचे मुख्यमंत्री पी.विजयन यांनी म्हटले आहे. या वायरसमुळे मृत्यू पावलेल्या चार नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले असून या नागरिकांचा मृत्यू निपाहमुळेच झाला असल्याचे सिद्ध झाले आहे, असे विजयन यांनी म्हटले. तसेच राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारकडून काही तज्ञ डॉक्टरांचे एक पथक राज्यात आले असून नागरिकांच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न केले जात आहे, असे विजयन यांनी सांगितले आहे.



काय आहे निपाह वायरस ?


निपाह वायरस हा मुख्यतः वाटवाघुळापासून निर्माण झालेला आहे. १९९८ मध्ये सर्वात प्रथम मलेशियामध्ये हा वायरस सापडला होता. मलेशियामधील डुक्कर प्राण्यांमध्ये सर्वात प्रथम हा वायरस आढळून आला होता. यानंतर यावर संशोधन सुरु करण्यात आले होते. या संशोधनानुसार फळे खाणारी वटवाघुळे अर्थात फ्रुट बॅट्स हे या विषाणूचे मूळ वाहक आहेत. निपाहग्रस्त वटवाघुळाने एखादे फळ खाल्ल्यास त्या उष्ट्या फळापासून इतर प्राण्यांना व त्यानंतर माणसांना या रोगाची लागण होते. मलेशियामध्ये यामुळे काही प्राणी दगावल्याचे देखील समोर आले होते. त्यानंतर २००१ ते २००४ मध्ये बांगलादेशामधील काही नागरिकांना या वायरसची लागण झाली होती. यामुळे बांगलादेशामध्ये तब्बल ५० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर भारतामध्ये काही ठिकाणी देखील रोगाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आलेली होती. 




(स्त्रोत : http://www.who.int/csr/disease/nipah/en/)

 



गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोझिकोडेमध्ये अनेकांना या वायरसची लागण झाली आहे. परंतु आजाराचे नेमके कारण न समजल्यामुळे सर्व जणांना हा आजार सामान्य वाटत होता. परंतु आता मात्र निपाहची खात्री पटल्यानंतर या रोगाची बाधा झालेल्या २५ रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर तज्ञांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. दुर्दैवाने यावर अद्याप ठोस उपाय आणि औषधे तयार झालेली नसल्यामुळे या आजाराची गंभीरता वाढली आहे.

रोगाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी


डॉक्टरांच्या माहितीनुसार या रोगाची लागण झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीला ताप चढण्यास सुरुवात होतो. यानंतर डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, शुद्ध हरपणे असे प्रकार घडतात. तसेच थोड्या दिवसानंतर व्यक्तीला श्वास घेण्यात देखील अडथळा होता. यामुळे नागरिकांना हालचाल करणे देखील अवघड जाते. काही डॉक्टरांच्या मते यावर तातडीने उपचार न केल्यास संबंधित रुग्ण कोमात जाण्याची देखील भीती असते. त्यामुळे रुग्णांची आणि स्वत:ची अधिक काळजी घेणे हा एकच त्यावरील प्रभावी उपाय आहे.

@@AUTHORINFO_V1@@