यानिमित्त तरी कॉंग्रेसचा न्यायालय आणि आयोगावर विश्वास बसला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

अमित शाह यांची कॉंग्रेसवर जोरदार टीका

जनमताच्या आधारवरच भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केल्याचे स्पष्टीकरण




नवी दिल्ली : 'कर्नाटकामध्ये सर्वाधिक जागांवर पराभूत होऊन देखील सत्ता स्थापन करण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे कॉंग्रेस पक्ष सध्या प्रचंड खूष झाला असून यानिमित्त का होईना परंतु काँग्रेस पक्षाचा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास बसला आहे' अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज केली आहे. नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते. विशेष म्हणजे कर्नाटकात येडीयुरप्पा यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शाह हे पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आले होते.

'कर्नाटकच्या जनतेनी या निवडणुकीत आपले मत पूर्णपणे कॉंग्रेस विरोधात दिलेले आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेसचे मोठमोठे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला असताना, कॉंग्रेसने जनमताविरोधात जाऊन जेडीएसला आपला पाठींबा दिला आणि सत्ता स्थापण्यासाठी नाहीनाही ते प्रयत्न केले. सरतेशेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर मात्र आता त्यांना लोकशाही, इव्हीएम मशीन, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर अखेरकार विश्वास बसला आहे.' अशी टीका शाह यांनी यावेळी केली. पुढे देखील यासर्व व्यवस्थेवर त्यांचा असाच विश्वास राहावा, अशी अशा बाळगतो, अशी कोपरखळी देखील त्यांनी यावेळी मारली.


जनमताच्या आदरावरच केला होता सत्ता स्थापनेचा दावा

बहुमताशिवाय कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी केलेल्या दाव्याविषयी बोलता शाह यांनी 'भाजपने जनतेच्या निर्णयाचा आदर करूनच सत्ता स्थापनेचा दावा केला होता' असे स्प्ष्टीकरण यावेळी दिले. जनतेनी कॉंग्रेसला नाकारल्यानंतर राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने सर्वात प्रथम राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. यावेळी कॉंग्रेस आणि जेडीएस यांच्यामध्ये युती देखील झालेली नव्हती. त्यामुळे जनतेच्या मताचा आदर करत भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला होता, असे शाह यांनी सांगितले. तसेच येडीयुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी कसल्याही मुद्दत मागितलेली नव्हती, असे देखील त्यांनी सांगितले.

मणिपूर आणि गोव्यामध्ये काँग्रेस नेते स्वस्थ बसले होते

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी गोवा आणि मणिपूर येथील निवडणुकांच्या तत्कालीन परिस्थितीविषयी देखील माहिती दिली. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस पक्षाला अधिक जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यावेळी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याऐवजी कॉंग्रेस नेते विजयाची धुंदीत स्वस्थ बसून होते. यावेळी भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत आपले बहुमत सिद्ध केले व त्याठिकाणी सत्ता स्थापन केली.


कॉंग्रेसने गेल्या चार वर्षात १४ राज्य गमावली

भाजपला बदनाम करण्यासाठी म्हणून कॉंग्रेसने अनेक प्रयत्न केले. भाजपचा लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला. परंतु खरी परिस्थिती ही आहे कि, गेल्या चार वर्षांमध्ये भाजप लोकसभेच्या ९ जागांवर पराभूत झाली आहे. परंतु कॉंग्रेस मात्र या वर्षात १४ राज्यांमध्ये भाजपकडून पराभूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

अमित शाह यांची संपूर्ण पत्रकार परिषद :

@@AUTHORINFO_V1@@