समतोलने घेतले पालकत्वनिलेश भील पुढील शिक्षणासाठी गुरुकुलात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
समतोलने घेतले पालकत्व
निलेश भील पुढील शिक्षणासाठी गुरुकुलात
जळगाव, २१ मे
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील निलेश भील याची शैक्षणिक जबाबदारी केशव स्मृती प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या समतोल प्रकल्प या स्वयंसेवी संस्थेने  घेतली असून पुढील शिक्षणासाठी मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर येथील श्री राम गोकुल आश्रम येथे त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार रोजी त्याला स्थलांतरीत करण्यात आले.
 
 
मध्यंतरी कौटुंबिक कारणातून घर सोडलेला निलेश भावासह हरवल्याने पोलीस यंत्रणांना घाम सुटला होता. सुमारे वर्षभरानंतर नीलेश गवसला. या काळात नीलेशचे शिक्षण सुटल्याने त्याच्या भविष्यातील संगोपनासाठी जळगांव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या समतोल प्रकल्प या स्वयंसेवी संस्थेने पावले उचलली. याच संदर्भात निलेशच्या नवीन शैक्षणिक सत्रात त्याला मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथील श्री राम गोकुल आश्रम येथे रविवारी स्थलांतरित करण्यात आले.
प्रतिष्ठानतर्फे प्रकल्प प्रमुख सपना श्रीवास्तव यांनी २० मे रोजी कोथळी येथे जावून निलेश व त्याची आई सोबत त्यांनी निलेशची जिल्हा परीषद शाळा गाठली. येथे त्यांनी शाळा सोडण्याचा दाखला व अन्य कागदपत्रे घेतली. निलेश व त्याची आई सोबत बर्‍हाणपूरकडे रवाना झाले. निलेश हा कोथळी येथील जिल्हा परीषद मराठी शाळेत इयत्ता ७ व्या वर्गात शिकत होता त्याने परीक्षा दिली नव्हती मात्र आरटीई कायद्या अंतर्गत त्याला वरच्या वर्गात पाठविले गेले. आता तो बर्हाणपूर येथील गायत्री ट्रस्ट संचालित श्रीराम गोकुल आश्रमात पुढील शिक्षण घेईल.
 
निलेशला निरोप देतांना कोथळी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण कुरकुरे, शिक्षक श्यामकांत रुले, अनिल पवार उपस्थित होते तर श्यामकांत रुले हे निलेश सोबत बर्‍हाणपूर गेले होते. निलेश याचा आठवीत प्रवेश निश्‍चित झाला. त्याचे संपूर्ण पालकत्व केशव स्मृती प्रतिष्ठान जळगांव संचलित समतोल प्रकल्प यांनी घेतले आहे. रविवारी संपूर्ण कागदपत्रांसह प्रकल्प प्रमुख श्रीमती सपना श्रीवास्तव व शाळेतील शिक्षक श्यामकांत रुले, निलेशची आई सुंदरबाई भिल हे सदर गुरुकुल आश्रमात जाऊन त्याचा प्रवेश निश्चित करून घेतला. सध्या उन्हाळी सुट्या असल्याने येत्या १५ जूनपासून तो तेथे शिकण्यास जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@