प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्यास सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्यास सुरुवात
जळगाव, २१ मे
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्याचा कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मनपा निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करताना प्रशासनाकडून २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा आधार घेतला गेला आहे.
 
 
प्रत्येक प्रभागात तेथिल अभियंत्याचा नेतृत्वाखाली मतदारांचा नावांची छाननी व तपासणी केली जात आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या वेळी शहरात एकूण मतदार ३ लाख ६८ हजार ४८५ इतके मतदार होते. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम या चार दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार याद्या तयार करतांना प्रत्येक मतदाराच्या घरी जावून जागा किंवा रहिवासातील बदल याबाबतची माहिती मनपा कर्मचारी जाणून घेत आहे.मतदार यादी करताना २०१४ ते २०१८ पर्यंतचे वाढीव मतदारांची संख्या अंतीम मतदार यादीशी जोडली जाणार आहे.
 
 मंगळवाररोजी अंतीम प्रभाग रचना जाहिर होण्याची शक्यता
प्रभाग रचनेचा अंतीम अहवाल ११ मे रोजी लवंगारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. राज्य निवडणूक आयोगाकडून या अहवालाचा आधारावर मंगळवारी अंतीम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
२५ मे रोजी महापालिकेकडून प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३० मे पासून इच्छुक उमेदवार किंवा मतदारांना काही आक्षेप असतील तर त्यांच्या हरकती मागविल्या जाणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@