मध्यप्रदेशमध्ये ट्रक आणि बसच्या धडकेत दहा नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमधील गुना गावात आज सकाळी झालेल्या ट्रक आणि बसच्या धडकेत दहा नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. धरनावदा पोलीस स्थानक क्षेत्रातील रुठियाईजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा नागरिकांचा मृत्यू झाला असून बरेच नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. 
 
 
 
या बसमध्ये कामगार लोक प्रवास करत होते जे उत्तर प्रदेशम्धीन गुजरातला रवाना होत होते. बसच्या क्षमतेपेक्षा जास्त नागरिक या बसमध्ये प्रवास करीत असल्याने बसचा ब्रेक लागला नाही आणि हा मोठा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. मात्र या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सध्या तरी घटनास्थळी बचाव कार्य जोरदार सुरु झाले आहे. 
 
 
 
स्थानिक पोलीस या अपघाताची चौकशी करीत असून सध्या जखमी नागरिकांवर जास्त लक्ष दिले जात आहे. या अपघातात बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झाल्याने राजकीय क्षेत्रातून दुख: व्यक्त केले जात आहे.  सध्या जखमी नागरिकांचा आकडा २० सांगितला जात आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@