मध्यप्रदेशात एका दिवसात दुसरा अपघात, राजधानी एक्सप्रेसला लागली आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

 
 
 
ग्वाल्हेर :  मध्यप्रदेशात आज सकाळी झालेल्या ट्रक आणि बसच्या धडकेनंतर आणखी एक मोठा अपघात घडला आहे. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे आज राजधानी एक्सप्रेसच्या बी-६ आणि बी-७ या डब्ब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. राजधानी एक्सप्रेस क्रमांक : २२४६१ दिल्ली हून विशाखापट्टणम येथे जात असताना हा अपघात झाला. यामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
 
 
 
 
 
रेल्वेगाडीवर विजेची तार पडल्यानी ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. अपघात झाला यावेळी यामध्ये काही आयएएसचे प्रशिक्षणार्थी असल्याचे देखील म्हटले जात आहे. सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तसेच अथक प्रयत्नांनंतर आगीवर देखील नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.
 
मध्यप्रदेशात एकाच दिवशी दोन मोठे अपघात झाल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान मध्यप्रदेशमधील गुना गावात आज सकाळी झालेल्या ट्रक आणि बसच्या धडकेत दहा नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. धरनावदा पोलीस स्थानक क्षेत्रातील रुठियाईजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा नागरिकांचा मृत्यू झाला असून बरेच नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.
@@AUTHORINFO_V1@@