जिल्हावासियांच्या आनंदामध्ये भर घालणाऱ्या जालना महोत्सवाचा जनतेने लाभ घ्यावा – रावसाहेब दानवे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
 
 
जालना :  धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याबरोबरच जिल्हावासियांच्या आनंदामध्ये भर घालणाऱ्या जालना महोत्सवाचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.
 
 
येथील बीजशितलच्या मैदानावर जालना महोत्सव २०१८ चे उदघाटन खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार राजेश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, सिने अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
खासदार दानवे म्हणाले की, जालना जिल्ह्याचा विकास होत असतानाच जिल्ह्यातील नागरिकांची सांस्कृतिक भुग भागावी तसेच स्थानिक कलावंताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यादृष्टीकोनातुन जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षीय मतभेद बाजुला सारुन सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याबरोबरच स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातुन होत असल्याचे सांगत केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या स्टॉलची उभारणी या महोत्सवामध्ये करण्यात आली.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@