विश्वपरिक्रमेनंतर आयएनएसव्ही तारिणीचे गोव्यात आगमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

नौदल महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
"नारी शक्ती पुरस्कारा"ने होणार गौरव
 

 

 
 
गोवा : "नाविका सागर परिक्रमा" या उपक्रमांतर्गत विश्वपरिक्रमेसाठी रवाना झालेल्या "आयएनएसव्ही तारिणी" आणि नौदल महिला अधिकाऱ्यांचे नुकतेच गोव्यात आगमन झाले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी या उपक्रमासाठी पणजी जवळ असलेल्या आयएनएस मांडवी या तळावरून नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले होते. तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते तारिणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीमुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच भारत सरकारनेदेखील त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांना "नारी शक्ती पुरस्कारा"ने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
 
 
सर्व महिला खलाशी असलेली ही भारताची पहिलीच सागर परिक्रमा ठरली आहे. जहाजाच्या कप्तान लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी असून अन्य सदस्यांमध्ये लेफ्टनंट कमांडर्स प्रतिभा जमवाल, पी. स्वाती आणि आणि लेफ्टनंट एस. विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता यांचा या उपक्रमामध्ये समावेश होता. या अधिकाऱ्यांनी आयएनडब्ल्यूटीसी मुंबई येथे नौका वहनाचे मुलभूल प्रशिक्षण घेतले आहे.
 
 
 
 
 
एकूण पाच टप्प्यांमध्ये हा उपक्रम महिला अधिकाऱ्यांनी पूर्ण केला असून या प्रदक्षिणेदरम्यान महासागरी हवामान, सागरी प्रवाह आणि सागरी प्रदूषणविषयक माहिती गोळा करत तसेच खोल समुद्रातल्या प्रदूषणाबाबतही नोंदी त्यांनी घेतल्या. प्रत्येक थांब्यादरम्यान खलाशी अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी विशेषत: मुलांशी संवाद साधला.
 
 
 
 
 
महासागराच्या भयावह लाटांना उत्तर देत ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रिका येथील चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
 
 

आयएनएसव्ही तारिणी : 

ओरीसा येथील प्रसिद्ध तारातारिणी येथील मंदिरापासून या नौकेची संकल्पना घेण्यात आली त्यामुळे नौकेचे नाव तारिणी असे ठेवण्यात आले होते. आयएनएसव्ही तारिणी ही नौका गोव्यातील मैसर्स एक्वेरियस शिपयार्ड प्रायवेट लिमिटेड येथे तयार करण्यात आली असून १८ फेब्रुवारी २०१७ रोजी या नौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. अॅल्यूमिनिअम आणि स्टीलच्या तुलनेत उत्तम प्रदर्शनासाठी नौकेची रचना लाकूड आणि फायबर ग्लासने करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तारिणीमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. उपग्रहाच्या मदतीने जगाच्या कोणत्याही कोपरऱ्यातून तारिणीशी संपर्क साधता येऊ शकतो. नवनिर्मित तारिणी नौकेची चाचणी ३० जानेवारी २०१७ ला यशस्वीरित्या करण्यात आली होती.

@@AUTHORINFO_V1@@