जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अरनिया सेक्टरमध्ये आज सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल सांबा आंतरराष्ट्रीय सीमेजवळ देखील पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार तसेच तोफगोळयांचा जोरदार मारा करण्यात आला. भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर दिले. 
 
 
जम्मू-काश्मीरमधील अरनिया सेक्टरमध्ये दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला असून या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षक आणि बीएसएफचे जवान यांनी चोख प्रतिउत्तर दिले. मात्र या गोळीबारात एक बीएसएफचा जवान आणि २ स्थानिक नागरिक जखमी झाले होते. 
 
 
जम्मू-काश्मीरमधील आरएस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून आता बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. रमजानच्या काळात भारत कोणतेही अभियान चालवणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने दिला होता. मात्र पुढून जर गोळीबार झाला तरचं भारत यावर कारवाई करेल आणि प्रतिउत्तर देईल असे भारताने सांगितले होते. त्यानुसार आता भारताने प्रतिउत्तर दिले आहे.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@