जिल्हाधिकार्‍यांनी भुसावळला येवून कामांचा आढावा घ्यावा - आमदार व नगराध्यक्षांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
जिल्हाधिकार्‍यांनी भुसावळला येवून कामांचा आढावा घ्यावा - आमदार व नगराध्यक्षांची मागणी
जळगाव, २१ मे
भुसावळ नगरपालिकेचे राजकारण चांगलेच तापले असून यात आजी व माजी आमदारांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सोमवार २१ रोजी १२ वाजेच्या सुमारास आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनराध्यक्ष युवराज लोणारी, सुनिल नेवे व इतर नगर सेवक ांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भेट घेवून त्यंाचा वेळ मागितला आहे.आपण प्रत्यक्ष भुसावळ नगर पालिका व शहरात येवून कामाची पाहाणी करून कामाचा आढावा घ्यावा अशी मागणी केली.
 
 
आ.संजय सावकारे म्हणाले की, ज्यांनी आमरण उपोषण केले त्यांनीच सभा चालु द्यायच्या नाही आणि नंतर त्यांचा बाऊ करून ओरड करत बसायचे असा प्रकार सुरू आहे.अमृत योजनेची चौकशीची मागणी केली आहे.जी योजना केंद्र सरकारकडून मंजुर झाली आहे.ती कशी बेकायदेशीर आहे हे आम्हाला समजत नाही.शहराचा विकास होवू द्यायचा नाही आहे.त्यामुळे आडकाठी पणा विरोधक करित आहे.तसेच रेल्वे हद्दीतील अतिक्रमणाचा विषयसुध्दा जिल्हाधिकारी याच्या समोर मांडला .त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वत: भुसावळ येथे येवून कामाची पाहणी प्रत्यक्ष करावी त्यानंतर ठरवावे की काम होते आहे की भष्ट्राचार यासाठी आम्ही त्यांचा वेळ मागुन घेतला आहे.ते भुसावळ येवून प्रत्यक्ष कामाची पाहणी करतील.असे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.
 
 
जनतेला व प्रशासनाला खरी परिस्थिती काय आहे.हे समजण्यासाठी आम्ही वेळ मागुन घेतला आहे.तसेच भाजप सत्तेवर आल्यापासुन प्रत्येक बैठकीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे.त्यामुळे ते कधीही आम्ही उपलब्ध करून देवू शकतो त्यामुळे खरे काय आहे.हे समोर येईल.असे ही सावकारे म्हणाले.
 
तर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, भाजपाची सत्ता भुसावळ नगर पालिकेवर आली. जे काही होते ते मागच्या सत्ताधार्‍यांनी केलेल्या घाणीमुळे भुसावळ शहराचे नाव घाण शहर म्हणून नोदले गेले.ते आम्ही शहराची साफसफाई करून स्वच्छ करून घेतले.त्याचे फलस्वरूफ म्हणून भुसावळ नगर पालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे.मात्र ज्यांना पाकिट संस्कृती शिवाय काहीच माहित नाही .त्यांनाच असे सुचू शकते .जर आम्हाला पाकिट संस्कृती करायची असती तर पहिल्या वेळेस भुसावळ गलिच्छ शहरात गेले नसते. असा चिमटा त्यांनी घेतला
भुसावळ नगरपालिकेतील विरोधी पक्ष जनाआधार पक्षाच्या नेत्यांनी १८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भुसावळनगर पालिकेच्या कारभारावर आक्षेप घेत आमरण उपोषण केले होते. या उपोषणात माजी आ. संतोष चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी भुसावळ नगर पालिकेत झालेल्या सर्व सभा रद्द करण्याची मागणी केली होती. उपजिल्हाधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर हे उपोषण सोडण्यात आले.या उपोषणाला राष्ट्वादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@