बँक खाते, सोशल मीडिया वापरताना जागरूक राहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांचे प्रतिपादन

 
 
 
 
नाशिक : दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक अगदी सहजपणे इंटरनेट वापरतात. मात्र हा वापर करत असताना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. जसे आपण शहराचे नागरिक सिटीझन असतो तसे नेट वापरणारे नेटिझन्स आहेत. अनेकदा आर्थिक नुकसान, सोशल मीडियातून नाते तयार करताना फसवणूक, मानसिक त्रास देणे, अश्लील फोटो तयार करणे आदी यातून निर्माण होतात. लोकांना इंटरनेटचा सुयोग्य वापर माहीत नाही. हाताळण्याचे पुरेसे ज्ञान नाही. यावर मार्ग काढण्यासाठी ‘पासवर्ड हॅकिंग टेक्निक्स व सिक्युरिटी’ सारख्या पुस्तकाचा नक्की उपयोग होईल, असे मत नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकच्या इन्फिनिटी आय.टी.चे संचालक निलेश दळवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सिंघल यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ‘पासवर्ड हॅकिंग टेक्निक्स व सिक्युरिटी’ हे मराठी भाषेत लिहिलेले पुस्तक असून, सर्व तांत्रिक मुद्दे लेखकाने सोप्या पद्धतीने समजावले आहेत. या पुस्तकाविषयी माहिती देताना लेखक दळवी यांनी सांगितले की, इंटरनेट वापरताना घ्यावी लागणारी खबरदारी आणि योग्य मार्गदर्शन सर्वांना मिळत नाही. या क्षेत्राविषयी समाजात गांभीर्य आणि जागरूकता मुळीच दिसत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन सामान्य लोकांना याची माहिती व्हावी, या उद्देशाने पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
या प्रकाशन सोहळ्याला नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सायबर पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, दीपक देसले, इन्फिनिटी आय.टी.चे संचालक निलेश दळवी, आर्यव सिक्युरिटी कन्सल्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च प्रा.लि.चे अमर ठाकरे, कुलकर्णी, प्रथमेश लळिंगकर, शिवम शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
लेखक निलेश दळवी हे नाशिकमध्ये असलेल्या इन्फिनिटी आय.टी.चे संचालक असून गेल्या दहा वर्षांहून अधिक कालापासून सायबर सिक्युरिटी या विषयावर काम करत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक संस्था, ६० महाविद्यालय यांना विविध कार्यशाळा, विशेष वर्ग, वर्कशॉप आदीच्या माध्यमातून लोकांना सायबर सिक्युरिटीचे धडे देत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@