एकीकडे चर्चा तर दुसरीकडे शिवसेनेचे षडयंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व पक्षांचा खरपूस समाचार

 
 
 
नालासोपारा : भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरची पोटनिवडणूक आमच्यावर लादण्यात आली. मात्र, त्यानंतर आम्ही चिंतामण वनगा यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन जिकवण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी आमचा मित्रपक्ष शिवसनेने आमच्या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, आमच्या मागे शिवसेनेने षडयंत्र करत वनगा यांना उमेदवारी दिल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. तसेच चिंतामण वनगा हे कोणाची खाजगी मालमत्ता नसून ते भारतीय जनता पक्षाचे विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
वसई तालुक्यातील नालासोपा-यात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. कपिल पाटील, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आ. रवींद्र चव्हाण, आ. विद्या चव्हाण, आ. राजेंद्र गावित, माजी आमदार विवेक पंडीत, मनोज तिवारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
जे गेलं ते गेलं. त्याचा विचार न करता पालघरमध्ये पुन्हा कमळ फुलवून चिंतामण वनगा यांना खरी श्रद्धांजली आम्ही देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान आपल्याला खिशात ठेवणारा खिसा आजवर कोणी तयारच केला नसल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार विवेक पंडित यांच्या मांडलेल्या एका मुद्दयावर दिले. आपली जागा ही केवळ लोकांच्या मनात असून आपल्याला खिशात टाकायला अमसा खिसाच तयार झाला नसून आमची बांधिलकी केवळ जनतेशीच असल्याचे ते म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी अन्य राजकीय पक्षांचादेखील समाचार घेतला.
 

इलाका हा कुत्र्यांचा असतो
 
वसई विरार हा शिटीचा इलाका असल्याचे म्हटले जाते. मात्र, इलाका हा कुत्र्यांचा असतो. आम्ही वाघ आहोत, आमचे जंगल आहे. जिथे जातो तिथे आमचेच जंगल असते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच वसईच्या जनतेला मत न दिल्यास पाणी कापू, बघून घेऊ अशा धमक्या दिल्या जतात. पण लोकांनी घाबरू नये. आम्ही शिवरायांचे सेवक आहोत आम्ही जनतेची काळजी नक्कीच घेऊ असे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले. तसेच काही लोकांनी भगवा ध्वज खांद्यावर घेऊन खंडणी गोळा करण्याचे काम केले असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
... तर २९ गावांची महापालिका बनवू
वसईतील हरित पट्टा कायम ठेवणार असून २९ गावांना हवे असल्यास त्यांची स्वतंत्र महानगरपालिका बनवण्यात येईल. जर त्या गावांना आपली ग्रामपंचायत हवी असेल तर त्यांची ग्रामपंचायतदेखील करण्याची व्यवस्था केली जाईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
सेनेने विश्वासघात केला - सावरा
वनगा यांनी ३ वेळा खासदार तर एकदा आमदार म्हणून काम केले. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर शिवसेनेने विश्वासघात केला. आम्ही उमेदवार घोषित केला नसतानाही त्यांनी फितवले हे सहन केले जाणार नाही, असे पालकमंत्री विष्णू सवरा यावेळी म्हणाले. तसेच आम्ही एकत्र काम केले असून नागरिकांच्या अनेक समस्याही सोडवल्या. वनगा यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जे काम केले त्याच तोडीचे काम आपल्याला करायचे आहे. तसेच त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी भाजपला निवडून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात- गावीत
जिल्ह्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ताधारी पक्षात असायला हवे, हा विचार करून आपण भाजपमध्ये आलो असल्याचे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी सांगितले. तसेच वसई विरार क्षेत्रात अद्ययावत रूग्णालय नाही, तसेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून भिवंडीपेक्षा दयनीय स्थिती झाल्याचे ते म्हणाले. तसेच नागरिकांच्या समस्यांची आपल्याला जाण असून वनगा यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपण काम करू असे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@