‘सरिता, खोलीकरण रुंदीकरण’ प्रशंसनीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

जिल्हाधिकार्‍यांकडून अभियानाची पाहणी

 
तळोदा :
शहरानजिकच्या खर्डी नदीतील गाळ काढण्याचे व खोलीकरण, रुंदीकरणाचे काम लोकसभागातून पालिकेने हाती घेतले आहे. या ‘सरिता मोहीम, खोलीकरण रुंदीकरण अभियान’ ला आज सकाळी भेट देत जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.
 
 
माजी मंत्री आणि तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठ नेते दिलावरसिंग पाडवी यांचे सुपुत्र आणि या अभियानाचे सूत्रधार आमदार उदेसिंग पाडवी , लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी, अनुप उदासी, हेमलाल मगरे, सुरेश पाडवी, प्रदीप शेंडे ,रामा ठाकरे, योगेश पाडवी, भास्कर मराठे,जलंधर भोई, नितीन पाडवी, भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, किरण सूर्यवंशी, राजू पाडवी, प्रसाद बैकर, संजय कलाल आदी उपस्थित होते,
 
 
मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी अभियानाबाबत मल्लिनाथ कलशेट्टी यांना माहिती दिली. त्यांनी पालिकेची आणि अभियानाच्या कार्यवाहीसाठी उदार हस्ते मदत करणार्‍या देणगीदार नपा पदाधिकारी, अन्य मान्यवर दानशूर नागरिकांचीही प्रशंसा करुन आवश्यक त्या सूचना दिल्यात.
 
 
संभाव्य नुकसान टळणार असल्याने जनताही समाधानी
अभियानाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. नदी पात्र खोल करण्यामुळे भूजल पातळी वाढणार आहे. शिवाय पुराचे पाणी वाहून जाणार असल्याने ते शहरात शिरणे थांबेल. परिणामी नदीकाठालागत असलेल्या डीबी हट्टी, मोठी हट्टी, कालिंका माता परिसरातील जनतेचे पुराच्या पाण्यापासून होणारे संभाव्य नुकसान टळत दिलासा मिळणार आहे, याबाबतही परिसरातील जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
वृक्ष लागवडीची सूचना
यात नदीचा किनार्‍यावर वृक्ष लागवड अभियान राबविण्यात यावे तसेच अरुंद नदी पात्राच्या खोलीकरणाबाबत विशेष लक्ष घालण्याबाबत सूचना दिल्यात.
@@AUTHORINFO_V1@@