रजनीकांत देखील म्हणतायेत, 'हा लोकशाहीचा विजय'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |



चेन्नई : कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर देशभरातून या घटनेवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असतानाच दाक्षिणात्य सिनेअभिनेते रजनीकांत यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली असून 'कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाला आहे' अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली आहे. तसेच २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.


चेन्नई येथे एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर रजनीकांत यांनी पत्रकारांशी थोडावेळ संवाद साधला. यावेळी कर्नाटकातील राजकीय घटनेचा उल्लेख करत, 'कर्नाटकात काल लोकशाहीचा विजय झाला आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच कर्नाटक राज्यपालांच्या निर्णयावर देखील त्यांनी यावेळी टीका केली. कर्नाटक राज्यपालांनी निवडणुकीनंतर जे काही केले ते लोकशाहीची थट्टा करणारे असे होते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे अत्यंत महत्त्वाचा असा होता, त्यामुळे न्यायलयाचे यासाठी आभारच मानावे लागेल' असे त्यांनी यावेळी म्हटले.


याचबरोबर २०१९ च्या निवडणुकांचा उल्लेख करत, आपला पक्ष येणाऱ्या निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याचासाठी सर्व तयारी पक्षाची झालेली आहे. तरी देखील निवडणुकीमध्ये युतीसाठी म्हणून अजून तरी कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही. तसेच प्रस्ताव आलाच तर निवडणुका घोषित झाल्यानंतरच यावर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@