राष्ट्रपती कोविंद आजपासून चार दिवसीय हिमाचल दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |



शिमला : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून आपल्या चार दिवसीय हिमाचल दौऱ्यासाठी म्हणून सहपरिवार शिमला येथे पोहचले आहे. हिमाचलचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले असून त्यांना 'गार्ड ऑफ ओनर' देखील देण्यात आला आहे.

आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती कोविंद यांचे हेलिकॉप्टर शिमल्यातील कल्याणी हेलिपॅडवर पोहचले यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्य मंत्री मंडळातील काही प्रमुख सदस्यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यानंतर त्यांना माशोब्रा येथे घेऊन जाण्यात आले व त्याठिकाणी 'गार्ड ऑफ ओनर' देण्यात आले. यानंतर त्यांना विश्रांतीसाठी म्हणून पाठवण्यात आले असून आज संध्याकाळी राज्यपाल देवव्रत यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणून खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील काही मान्यवर मंडळींना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.



राष्ट्रपती कोविंद हे याठिकाणी तब्बल चार दिवस थांबणार असून त्यानंतर २५ मे ला नवी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. आपल्या या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते हिमाचलमधील दोन दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार आहेत. तसेच हिमाचलमधील स्थानिक नागरिकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. याच बरोबर हिमाचलमधील काही प्रेक्षणीय स्थळांना देखील ते भेट देणार आहेत. कोविंद यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिल्याच हिमाचल प्रदेश दौरा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या या दौऱ्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
@@AUTHORINFO_V1@@