शिक्षक बदल्यांमध्ये निकषांचे पालन नाहीचपती-पत्नीची ताटातूट; उद्या सीईओंना देणार निवेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |
शिक्षक बदल्यांमध्ये निकषांचे पालन नाहीच
पती-पत्नीची ताटातूट; उद्या सीईओंना देणार निवेदन
 
जळगाव, १९ मे
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पार पडली असून ह्या बदल्यांमध्ये निकषांचे पालन झाले नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहेत़ बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रीकरणाचे बहुतांश अर्ज होते़ मात्र, जागा रिक्त नसल्याचे कारण दाखवून पती-पत्नीची ताटातूट बदली प्रक्रियेत करण्यात आली असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे़ याबाबत शिक्षक सोमवारी सीईओ शिवाजी दिवेकर यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने झाली आहे. त्यात अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरल्यामुळे अनेकांना मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण मिळाली तर, काही शिक्षकांवर अन्याय झाला असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात आला आहे़
 
 
संघटनेचे सीईओंना निवेदन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना निवेदन देण्यात आले. बदल्याबाबत आढळलेल्या तुटींचा उल्लेख निवेदनात केला आहे़ निवेदनात नमूद केले आहे की, एच.एम.लॉगीनवर विस्थापित शिक्षकांचे नावे दिसत नाही, विस्थापित शिक्षकांना फॉर्म भरण्याची मुदत १७ ते १९ मे पर्यंत होती, तर पोर्टल अजुन सुरु नाही, विस्थापितमध्ये महिला शिक्षकांवर जास्त अन्याय होण्याचा संभव आहे. विस्थापित शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त गावे दिसत नाही़ बदल्या झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. महिला शिक्षिका यांना ये-जा करण्याकरीता सोईचे गावे दिली पाहिजे़ बदल्यामध्ये सिनिअर शिक्षकाला ज्युनिअर शिक्षकाने खो दिला आहे़ हा अन्याय दूर करावा, ३० किमी आतील पती-पत्नी एकत्रिकरणात पत्नी शिक्षिका विस्थापित झालेल्या आहेत. अशांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे़
 
@@AUTHORINFO_V1@@