विवादास्पद वक्तव्य़ामुळे संजय निरुपम पुन्हा एकद्या वादाच्या भोवऱ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |


 
 
 
नवी दिल्ली : काल कर्नाटक इथं भारतीय जनता पक्ष बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा विवादास्पद वक्तव्य केलं आहे. त्यांनी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांना कुत्र्याची उपमा दिली असून त्यांच्या इतके प्रमाणिक अजून कुणीच नाही असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

 
 
 
 
 
 
 
"आज वजूभाई वाला यांनी त्यांची "वफादारी" म्हणजेच प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. त्यांच्यात इतका जास्त प्रमाणिकपणा आहे की आता भारतातील सर्व आपल्या कुत्र्यांची नावे वजूभाई वाला ठेवतील कारण त्यांच्याइतके प्रामाणिक तर कुणी असूच शकत नाही." असे वक्तव्य त्यांनी काल माध्यमांसमोर केले.



 
 
 
त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावरु त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे याआधी देखील त्यांनी अनेकदा असे विवादास्पद वक्तव्य केले आहे, ज्यामुळे अनेक वेळा अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राकीय वैर असले तरी देखील वजूभाई वाला एका राज्याचे राज्यपाल आहेत, आणि त्यांच्या पदाचा मान हा राखलाच पाहीजे अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवरुन येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@