भारतीय सैन्येच्या उत्तरानंतर पाकिस्तानी सैन्य 'ताळ्यावर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

भारताला गोळीबार थांबवण्याची केली विनंती 




(प्रतिकात्मक छायाचित्र )
जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने देखील चोख प्रत्युत्तरानंतर अखेरकार पाकिस्तानी लष्कर ताळ्यावर आले असून भारताने गोळीबार करणे थांबबावे, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून अनेक चौक्या आणि बंकर उद्धवस्त झाले आहेत, त्यामुळे भारताने संधी करावी, अशी मागणी पाक लष्कराने सुरु केली आहे.

 
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पाकिस्तानच्या गोळीबाराला आज भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबारासह बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी चौक्यांना लक्ष करत आज थेट रॉकेटने हल्ला चढवण्यास सुरुवात केली. याचा एक व्हिडीओ देखील भारतीय लष्कराने जारी केला आहे. यामध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बंकरला लक्ष करत रॉकेटचा मारा केल्याचे दिसत आहे. व यामुळे पाकिस्ताच्या चौक्या आणि बंकर उद्धवस्त झाल्याचे देखील दिसत आहे. यात हल्ल्यात पाकिस्तानचे काही जवान देखील शहीद झाले. यानंतर देखील भारतीय जवानांनी आपला हल्ला सुरु ठेवत पाकिस्तानच्या लष्करावर गोळीबार सुरुच ठेवला तेव्हा मात्र पाक लष्करी अधिकाऱ्याने भारतीय लष्कराला फोन लावत गोळीबार थांबवण्याची विनंती केली.


भारत सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये रमजाननिमित्त शस्त्रसंधी पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी पाकिस्तान लष्कराने भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये एका बीएसएफ जवानासह एकूण ६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १० जण गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली होती.
@@AUTHORINFO_V1@@