पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पासून सोची येथील दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

 
 
सोची (रशिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पासून सोची म्हणजेच रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी त्यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांची यावेळची भेट अनेक कारणांनी आधीच्या भेटींपेक्षा वेगळी असेल अशी माहिती भारताचे रशिया येथील राजदूत पंकज सरण यांनी दिली.
 
 
 
 
 
अनेक द्विपक्षीय विषयांवर चर्चा करण्यासाठी पुतीन यांनी स्वत: मोदी यांना आमंत्रण दिले आहे. यामुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत मिळेल, तसेच यावेळी दोन्ही देशांसाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे, असेही सरण यांनी सांगितले.
या विषयांवर चर्चा अपेक्षित :

१. यावेळी दोन्ही देश एकमेकांच्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करण्यासाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
२. परमाणु सहयोगाविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
३. दहशतवाद या विषयावर देखील चर्चा करण्यात येणार असे सांगण्यात येत आहे.
बांग्लादेश सरकार रूपड येथे परमाणू संयत्र लावणार आहे. यामध्ये रशियाने देखील सहभाग घ्यावा अशी भारताची इच्छा आहे. याविषयी या दोन्ही नेत्यांमध्ये विशेष चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@