जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणेतील अनेकांनीजवखेड्यात केले श्रमदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |
 
 
जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणेतील अनेकांनी
जवखेड्यात केले श्रमदान
जळगाव, २० मे
पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जवखेडा या गावामध्ये आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी श्रमदान केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार स्मिताताई वाघ, पंचायत समितीच्या सभापती वजाताई यांनीही श्रमदान केले.
 
 
महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यासाठी अभिनेता अमीर खानच्या पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी राज्यातील ७५ तालुक्यांची निवड केली आहे. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा या तालुक्यांची निवड झाली आहे.  रविवारी २० मे रोजी जिल्हाधिकार्‍यांसोबत एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, एरंडोल, अमळनेर, चोपड्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, मंगळग्रह मंदिर गृप, आम्ही अमळनेर व्हाट्सअप गृपचे सदस्य, ग्रामस्थ, अमळनेर, पारोळा, एरंडोल तालुक्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे सदस्य यांनी श्रमदान केले.
 
 
श्रमदानासाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे रात्रीच जवखेडा येथे मुक्कामी गेले होते. त्यांनी पहाटे पाच वाजेपासूनच ग्रामस्थांशी संवाद साधत श्रमदानास सुरवात केली. यावेळी श्रमदानासाठी विविध संघटना, संस्थांचे हजारो नागरिक उपस्थित होते. गेल्या मंगळवारी अभिनेता अमीर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी जवखेडा येथे येऊन गावात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून गावात सुरु असलेल्या कामांची प्रशंसा केली होती.
तसेच वॉटर कपसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता गावाने केली असल्याने श्रमदान करतांना ग्रामस्थांमध्ये उत्साह जाणवत होता.
पाणी टंचाईने होरपळलेल्या
जनतेचा वाढता सहभाग
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, पाण्याचा वाढता उपसा, वापर आणि दुसर्‍या बाजूला पावसाचे घटते प्रमाण, अनियमितता यामुळे गेल्या ५- ६ दशकापासून नद्या वाहाणे इतिहासजमा झाले आहे. नंतर आड, विहिरीही आटल्याने नाहीशा होत भूजल पातळी काही वर्षात कमालीची खोलवर गेली आहे. साहजिकच शेती, शेतकरी दोन्हीही संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची धावाधाव वाढली आहे. अनेक गावी २-४ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. काही गावी तर १०-१५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. पशूपक्षी, वन्यजीवांनाही पाण्याअभावी जगणे कठीण झाले आहे, वृक्षराजी सुकत आहे...गावोगावच्या मुलांचे बालपण व शिक्षण पाण्याच्या शोधात हरपले आहे...भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी अडवणे, जिरवणे आवश्यक झाले आहे. लोकसहभागातूनच जलसंधारणाची कामे कमी खर्चात व तातडीने होणे शक्य आहे, हे जाणून घेत शासन आणि पाणी फाउंडेशन तसेच नाम आदी संस्था यांनी पुढाकार घेत ही चळवळ उभी केली आहे. तिला साहजिकच पाणी टंचाईने होरपळलेल्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
उत्साहाला, सहभागाला उधाण
जिल्हाधिकारी मुक्कामी येण्याची आणि त्यांनी श्रमदानात सहभाग घेण्याची अभूतपूर्व घडामोड जवखेडेकरांना सुखद धक्का देणारी ठरली आहे. त्यांच्यासह अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधीही जवखेड्यात आल्याने या उत्साहाला, सहभागाला उधाण आल्याचे चित्र जवखेडा परिसराने अनुभवले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@