सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा राष्ट्रीय विक्रम, सातव्यांदा सर केले एव्हरेस्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  सीमा सुरक्षा दलाचे जवान लवराजसिंह धर्मशक्तु यांनी एक राष्ट्रीय विक्रम करत भारताचे नाव उंचावले आहे. त्यांनी सातव्यांहा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करत एक विक्रम केला आहे. सीमा सुरक्षा दलाने त्यांचे अभिनंदन करत, त्यांच्यामुळे भारताला एका गौरव क्षणाला अनुभवता आले असल्याचे सांगितले आहे.

सीमा सुरक्षा दलाचे सहाय्यक कमांडर लवराज सिंह धर्मशक्तु यांच्या नेतृत्वाखाली सीमा सुरक्षा दलाचे एक पथक दुसऱ्या बेसकॅम्पमधून सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी निघाले. अथक प्रयत्नांनंतर आणि कठीण परिस्थितीवर मात करत या पथकाने एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर केले आहे. यामधे धर्मशक्तु यांनी या आधी ६ वेळा हे शिखर सर केले आहे, सातव्यांदा ही कामगिरी करत त्यांनी एक मोठा विक्रम केला आहे.

 
 
 
'क्लीन अॅण्ड सेव्ह ग्लेशिअर' या मोहिमेंतर्गत ही कामगिरी करण्यात आली होती. या कामगिरीसाठी दोन गट तयार करण्यात आले होते. ज्यापैकी पहिल्या गटाचे नेतृत्व धर्मशक्तु करत होते. पहिल्या गटाने हे ८८४८ मीटर उंच शिखर पहाटेच्या सुमाऱ्यास सर केले, तर दुसरा गट आज रात्री उशीरा पर्यंत सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पथकात २५ जणांचा समावेश होता.

या संघात तीन अधिकारी, तीन उपनिरीक्षक अधिकारी, १७ अन्य कर्मचारी आणि दोन वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. ट्रेक सुरू करण्यापूर्वी, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात धौलाधार आणि पीर पंजाल पर्वतराजीतील या संघाला पूर्व प्रशिक्षण देण्यात आले होते.

सीमा सुरक्षा दलाची ही कामगिरी भारतासाठी एक अत्यंत महत्वाची आणि गौरवाची घटना आहे, आणि भारतातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@