१५ दिवसात नाही तर शपथविधीच्या २४ तासांआधीच सिद्ध करणार बहुमत : कुमारस्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

 
 
बंगळुरु : कर्नाटक येथे अतिशय रंजक पद्धतीने झालेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता तेथील राजकीय परिस्थिती दर तासाला बदलत असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे, मात्र १५ दिवसात नाही तर शपथविधीच्या १४ तासांआधीच बहुमत सिद्ध करणार असल्याचे कुमारस्वामी यांनी जाीहर केले आहे.
 
 
 
 
 
दरम्य़ान जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली असून ते बुधवार २३ मे २०१८ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आधी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी २१ मे तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र सोमवार २१ मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी असल्या कारणाने त्यांचा शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे.
 
 
या निवडणूकीत काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आता जनतेचा कल भाजपकडे असून देखील जेडीएस आणि काँग्रेसची युती होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@