५६ इंचाची छाती सोडा ५५ तास देखील सत्ता टिकली नाही : प्रकाश राज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

 
 
कर्नाटक :  "कर्नाटक आता भगवं नाही तर रंगीत दिसणार, ५६ इंचाची छाती तर विसरूनच जा मात्र ५५ तास देखील सत्ता सांभाळता आली नाही. कर्नाटकची जनता आता आणखी राजकीय चिखलफेकीसाठी तयार रहा." असे म्हणत अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश राज यांनी "खेळ सुरु होण्या आधीच संपला" असे म्हणत भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले आहे.
 
 
 
 
काल येडीयुरप्पा यांनी कर्नाटक येथील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना प्रकाश राज यांनी वरील मत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटर खात्याच्या माध्यमातून त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच आपला राजीनामा सादर केला. संख्याबळाचा आकडा गाठण्यास अपयशी ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकात सत्तासंघर्ष अतिशय रोचक अवस्थेवर असताना येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. भापने सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे अवघ्या देशाच्या नजरा कर्नाटक विधानसभेकडे लागल्या होत्या. मात्र भाजपला हा विश्वास पूर्ण करता आला नाही, आणि येडुयरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
@@AUTHORINFO_V1@@